चिनावल शिवारातील विहिरीत तरुणाचा मृतदेह आढळला

Body of missing youth from Chinaval found in well सावदा (16 सप्टेंबर 2025): चिनावल, ता.रावेर गावातील तरुणाचा विहिरीत मृतदेह आढळला. ही घटना सोमवार, 15 सप्टेंबर रोजी समोर आली. समीर सुराज तडवी (30, रा.चिनावल) असे मृताचे नाव आहे. सुमारे सहा दिवसांपासून तो बेपत्ता असल्याची माहिती आहे.

मृत्यूचे कारण अस्पष्ट
समीर तडवी हा 9 सप्टेंबर रोजी दुपारी दोन वाजेपासून बेपत्ता होता. त्याचा मृतदेह 15 सप्टेंबर रोजी दुपारी चार वाजता विहिरीत सापडला. तरुणाच्या मृत्यूचे नेमके कारण अस्पष्ट आहे. साहिल इलमोद्दिन तडवी (26) यांनी सावदा पोलिसांना माहिती कळवताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी रावेर येथील ग्रामीण रुग्णालयात पाठवला.

सावदा पोलिसांनी या प्रकरणात अकस्मात मृत्यूची नोंद केली. सहायक पोलिस निरीक्षक विशाल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अधिक तपास पोलि उपनिरीक्षक राहुल सानप करीत आहेत.