Robbery in Therala Shivara; Couple beaten up and looted पाटोदा (18 सप्टेंबर 2025) : पाटोदा तालुक्यातील थेरला शिवारात सोमवारी मध्यरात्री भीमराव मिसाळ यांच्या घरावर अज्ञात चोरट्यांनी हल्ला करून मिसाळ दाम्पत्याला लोखंडी रॉडने जबर मारहाण केली. या घटनेत मिसाळ पती-पत्नी गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

काय घडले दाम्पत्यासोबत ?
सोमवारी मध्यरात्री 1 वाजण्याच्या सुमारास चोरटे मिसाळ यांच्या घरात घुसले. त्यांनी घरच्यांना जिवे मारण्याच्या धमक्या देत मारहाण सुरू केली. लोखंडी रॉडने झालेल्या हल्ल्यात भीमराव मिसाळ यांच्या डोक्याला व शरीराला गंभीर दुखापत झाली तर पत्नी सत्यभामा याही जखमी झाल्या. त्यांच्यावर उपचार सुरू असल्याने दुपारपर्यंत जबाब नोंदवण्याचे काम सुरू होते.
घटनेनंतर पाटोदा पोलिसांनी भेट दिली. बीड येथून श्वानपथक व ठसे तज्ज्ञांना पाचारण करण्यात आले. श्वान पथक दरोडेखोरांचा माग काढू शकले नाही. त्यामुळे किती रोकड आणि दागिने लंपास झाले याचा आकडा निश्चित झाला नव्हता. मात्र मोठ्या प्रमाणावर ऐवज लंपास झाल्याचा अंदाज आहे. धाडसी दरोड्यामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तातडीने गुन्हेगारांचा शोध घेऊन गस्त वाढवावी, अशी मागणी केली आहे.