Married girl molested in Kingaon village यावल (18 सप्टेंबर 2025) : यावल तालुक्यातील किनगाव बुद्रुक गावात एका 22 वर्षीय विवाहित तरुणीचा गावातीलच एकाने विनयभंग करीत विवाहितेच्या मनाला लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य केले. आरडाओरड केली तर तुझ्या परिवाराला मारून टाकेल, अशी धमकी दिली. याप्रकरणी यावल पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

संशयीताविरोधात गुन्हा दाखल
किनगाव बुद्रुक, ता.यावल गावातील 22 वर्षीय विवाहित तरुणी आपल्या घराबाहेर असताना शनिवारी दुपारी संशयीत राहुल बाळू पवार याने विवाहितेच्या मनाला लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य करीत तिचा विनयभंग केला तसेच तू जर आरडा-ओरड केली तर तुझ्या परिवाराला जिवंत सोडणार नाही, अशी धमकी दिली.
या प्रकरणी विवाहितेने दिलेल्या फिर्यादीवरून यावल पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास यावल पोलिस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस नाईक किशोर परदेशी करीत आहे