Eicher truck caught fire on Sangvi Budruk to Hingona road यावल (18 सप्टेंबर 2025) : यावल तालुक्यातून मार्गस्त होणार्या अंकलेश्वर-बर्हाणपूर राज्य मार्गावर सांगवी बुद्रुक ते हिंगोणा दरम्यानच्या रस्त्यावर असलेल्या पेट्रोल पंपाच्या अलीकडे चालत्या आयशर ट्रकने पेट घेतला. ही घटना बुधवारी सायंकाळी घडली. हा प्रकार चालकाच्या निदर्शनास येताच त्यांनी तातडीने ट्रक बाजूला केला व नागरिकांनी त्या ठिकाणी धाव घेऊन आग विझवली यामुळे मोठी दुर्घटना टळली.ट्रक जळून ट्रक मालकाचे मोठे नुकसान झाले.

काय घडले नेमके ?
अंकलेश्वर-बर्हाणपूर राज्य मार्गावर यावलकडून फैजपूरकडे सांगवी बुद्रुक गाव ते हिंगोणा या गावाच्या दरम्यान शंतनू पेट्रोल पंप आहे. या पेट्रोल पंपाच्या अलीकडे साहेबराव बडगुजर (रा.राणीचे बांबरुड, ता.पाचोरा) हे आयशर ट्रक (क्रमांक एम. एच. 14 सी. वाय. 7917) घेऊन जात होते.
चालत्या ट्रकला अचानक आग लागली. हा प्रकार त्यांच्या निदर्शनास येताच त्यांनी रस्त्याच्या कडेला आपली आयशर ट्रक थांबवली. घटनास्थळी तातडीने आकाश सोनवणे, अजय मेघे, कशीश तायडे, विजय मेघे, सागर तायडे व शंतनू पेट्रोल पंपावरील कर्मचार्यांनी धाव घेतली आणि तातडीने ही आग विझवली. यात सुदैवाने मोठी दुर्घटना टळली आहे मात्र आग लागल्यामुळे आयशर ट्रकचे मोठे नुकसान झाले.