One beaten up over minor reason at Atraval bus station यावल (18 सप्टेंबर 2025) : यावल तालुक्यातील अट्रावल गावातील बस स्थानकाजवळ 43 वर्षीय इसमास किरकोळ कारणावरून एकाने शिविगाळ करीत मारहाण केली तसेच त्याच्या हाताला दुखापत केली. ही घटना रविवारी घडली. याप्रकरणी यावल पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

काय आहे मारहाण प्रकरण ?
अट्रावल, ता.यावल गावातील बसस्थानकावर राजेंद्र विठ्ठल लोहार (43) उभे असताना तेथे किरकोळ कारणावरून त्यांच्याशी वाद घालत रिंकू आनंदा तायडे याने त्यांना शिविगाळ केली व लोखंडी पत्राच्या झार्याने त्यांच्या डाव्या हाताला मारून दुखापत केली. याप्रकरणी यावल पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलिस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार नरेंद्र बागुले करीत आहे.