Child murder case in Yaval city: Accused youth remanded in police custody यावल (18 सप्टेंबर 2025) : यावल शहरातील बाबूजी पुरा भागातील रहिवासी एका पाच वर्षीय अल्पवयीन बालकावर लैंगिक अत्याचार करीत त्याची हत्या करण्यात आली. या गुन्ह्यात अटक करण्यात आलेल्या तरुणावर प्रारंभी खुनाचा गुन्हा व नंतर बाललैंगिक अत्याचाराचेे कलम वाढवण्यात आले. आठ दिवसांच्या पोलिस कोठडीत असलेल्या या तरुणाची पोलिस कोठडी संपल्यावर त्यास भुसावळ येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयात हजर केले असता तरुणास पुन्हा 17 सप्टेंबर पर्यंत दोन दिवसाची पोलिस कोठडी सुनावण्यात आली.

काय घडले यावल शहरात?
शहरातील बाबूजी पुरा भागात एक पाच वर्षीय बालक हा शुक्रवार, 5 सप्टेंबर रोजी बेपत्ता झाला होता व 6 सप्टेंबर रोजी त्याचा मृतदेह त्याच्या शेजारी रहिवाशी शेख शाहिद शेख बिस्मिल्ला न्हावी (22) या तरुणाच्या घरात मिळून आला होता. त्याने या बालकाची गळा आवळून हत्या करून त्याला जाळून टाकले होते. व मृतदेह पोत्यात लपवला होता.
दरम्यान, शव विच्छेदनाचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर बालकावर लैंगिक अत्याचार झाल्याची उघडकीस आले होते व प्रारंभी दाखल खुनाच्या या गुन्ह्यात बालकांचे लैंगिक अत्याचार पासून संरक्षण कायदा पोक्सो अन्वये कलमाची वाढ करण्यात आली होती. सदर तरुण हा सध्या 15 सप्टेंबर पर्यंत पोलिस कोठडी सुनावली.
पोलिस कोठडी संपल्यावर त्याला सोमवारी अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाच्या विशेष न्यायाधीशांसमोर हजर केले असता त्यास पुन्हा 17 सप्टेंबरपर्यंतची दोन दिवसाची पोलिस कोठडी सुनावण्यात आली.तपास पोलिस निरीक्षक रंगनाथ धारबळे, हवालदार वासुदेव मराठे करीत आहे.