पाचोरा पोलिसांची कारवाई : विक्रीसाठी आणलेल्या 18 तलवारी तरुणाकडून जप्त

Youth caught with 18 swords in Pachorya: Action creates excitement पाचोरा (19 सप्टेंबर 2025) : पाचोरा पोलिसांनी एका तरुणाकडून तब्बल 18 तलवारींचा साठा जप्त केल्याने शहरात खळबळ उडाली आहे. जप्त तलवारींची किंमत 54 हजार इतकी आहे. सोहेल शेख तय्युब शेख (24) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.

गोपनीय माहितीवरून कारवाई
पाचोरा पोलिस ठाण्याचे निरीक्षक राहुलकुमार पवार यांना संशयीताबाबत गोपनीय माहिती मिळाल्यानंतर गुरुवार, 18 सप्टेंबर 2025 रोजी रात्री 11 वाजण्याच्या माहिजी नाका परिसरात कारवाई करण्यात आली. शेख तय्युब शेख (24, स्मशानभूमी रोड, बाहेरपुरा, पाचोरा) याला एकूण 18 तलवारींसह पकडण्यात आले तर आरोपीने काही तलवारी आधीच विकल्या गेल्याची कबुली दिली.

यांनी केली कारवाई
ही कारवाई पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, अपर पोलिस अधीक्षक कविता नेरकर, उपविभागीय पोलिस अधिकारी अरुण आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली पाचोरा पोलिस निरीक्षक राहुलकुमार पवार, पोलिस उपनिरीक्षक कृष्णा घायाळ, कैलास ठाकूर, पोलिस नाईक संदीप राजपूत, जितेंद्र पाटील, हरीश परदेशी आदींच्या पथकाने केली.