Cylinder bursts in tea shop : Youth from Bhadgaon dies भडगाव (20 सप्टेंबर 2025) : भडगावातील चहा दुकानात सिलिंडर स्फोट होवून त्यात अनेक जण होरपळले होते तर हॉटेल चालकाचा मुलगा जखमी झाला होता. त्याच्यावर छत्रपती संभाजीनगरात उपचार सुरू असताना त्याचा गुरुवारी सायंकाळी मृत्यू झाला. सोहिल शेख रफिक मनियार (28, रा.ग्रीन पार्क कॉलनी, भडगाव) असे मयताचे नाव आहे.

काय घडले भडगाव शहरात ?
भडगावात बस स्थानकानजीक असलेल्या चहा दुकानात रविवार, 14 रोजी दुपारी गॅस सिलिंडरचा मोठा स्फोट झाला होता. या स्फोटात सोहिलसह 13 जण जखमी झाले होते तर सोहिल गंभीर जखमी झाला. त्याच्यावर धुळे येथे उपचार करण्यात आले. तिथून त्यास छत्रपती संभाजीनगर येथे हलवण्यात आले मात्र त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.