Child gets severe shock while removing diaper : Incident in Jalgaon जळगाव (20 सप्टेंबर 2025) : छतावर वाळण्यासाठी टाकलेली गोधडी काढताना बालकाला घराजवळून गेलेल्या वीजवाहक तारांचा स्पर्श होऊन तो गंभीर जखमी झाला तर इतर दोघांना ईजा झाल्याची माहिती आहे. ही घटना शनिवार, 20 सप्टेंबर रोजी दुपारी 12 वाजेच्या सुमारास मेहरुण परिसरात घडली.

काय घडले जळगाव शहरात ?
अजय बुधा सोनवणे (14, रा.मेहरुण) हा बालक गच्चीवर धुतलेल्या गोधड्या काढण्यासाठी गेल्यानंतर गोधडी काढत असताना घराजवळून गेेलेल्या विद्युत तारांना त्याचा स्पर्श होवून अजय त्याला चिटकला. हा प्रकार आजूबाजूच्या मंडळींच्या लक्षात आला. त्यावेळी लाकडी काठीच्या आधारे अजयची सुटका करून त्याला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. या ठिकाणी त्याच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. घटनेमुळे मेहरूण येथे मोठी गर्दी झाली होती. तर अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी शासकीय रुग्णालयात गर्दी केली होती.