जळगाव (21 सप्टेंबर 2025) : जळगावातील प्रेम नगर, बजरंग पूल व बी जे नगर परिसरातील रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडल्यामुळे नागरिकांना प्रचंड हाल सहन करावे लागत होते. विशेषत: शालेय विद्यार्थी, महिला व ज्येष्ठ नागरिकांना ये-जा करणे कठीण झाले होते. या गंभीर समस्येची दखल घेत समाजसेवक सागर जिजाबराव पाटील यांनी स्वखर्चाने खड्ड्यांची तात्पुरती दुरुस्ती करण्याचे काम हाती घेतल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे..

या कामासाठी सागर जिजाबराव पाटील यांनी स्वतः उपस्थित राहून पुढाकार घेतला तसेच मित्रपरिवाराच्या सहकार्याने हे काम पूर्ण केले. यामध्ये कल्पेश मालपाणी, अल्पेश न्याती, समीर तडवी, बंटी वाणी, दीपक पाटील, अथर्व पाटील, दीपक वाणी, सिद्धार्थ कोलते यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
परिसरातील नागरिकांनी या उपक्रमाचे कौतुक केले असून, आता पुढील नगरसेवक म्हणून सागर जिजाबराव पाटील यांचे नाव चर्चेत येऊ लागले आहे. नागरिकांचे म्हणणे आहे की, रस्त्यांवरील खड्ड्यांकडे महापालिका प्रशासनाने वेळोवेळी दुर्लक्ष केले. मात्र अशा परिस्थितीत सागर जिजाबराव पाटील यांनी नागरिकांच्या अडचणी ओळखून केलेले हे कार्य उल्लेखनीय आहे.
या कामामुळे परिसरात सकारात्मक वातावरण निर्माण झाले असून, ज्येष्ठ नागरिकांनीही प्रतिक्रिया व्यक्त करताना असे नमूद केले की, नगरपालिका प्रशासनाने आता तरी जागे होऊन कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची गरज आहे.
सागर जिजाबराव पाटील यांनी याप्रसंगी सांगितले की, समाजातील प्रश्न सोडवणे हीच खरी सेवा आहे. नागरिकांचे प्रश्न तातडीने सोडवण्यास आपली प्राथमिकता असेल.