नातेवाईकांकडे आलेल्या अल्पवयीनावर बलात्कार : भुसावळातील आरोपीला अटक

Rape of minor who came to relatives: Accused arrested in Bhusawal भुसावळ (22 सप्टेंबर 2025) : भुसावळ  शहरातील एका भागातील रहिवासी असलेल्या अल्पवयीन मुलीवर संशयीताने अत्याचार केल्याची घटना 16 ते 17 सप्टेंबर 2025 दरम्यान घडली. याप्रकरणी 16 वर्षीय पीडीतेच्या तक्रारीवरून संशयीत आरोपी अकिल अब्दुल अजीज शेख (भुसावळ) विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपीला पोलिसांनी अटक केली असून त्यास पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

भुसावळात आलेल्या अल्पवयीनावर अत्याचार
नाशिकमधील पीडीता काही दिवसांसाठी भुसावळात नातेवाईकांकडे आल्यानंतर संशयीताने 16 ते 17 सप्टेंबर दरम्यान तिच्यावर अत्याचार केला व कुटूंबाला हा प्रकार सांगितल्यानंतर आरोपीविरोधात भुसावळ बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपीस न्यायालयाने दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. तपास पोलिस निरीक्षक राहुल वाघ करीत आहेत.