Accused caught with drugs worth Rs 60,000 in Jalgaon जळगाव (22 सप्टेंबर 2025) : जळगाव गुन्हे शाखा व एमआयडीसी पोलिसांनी संयुक्त कारवाई करीत 60 हजार रुपये किंमतीचा व सहा ग्रॅम वजनाचा एम्फेटामाईनसदृश अंमली पदार्थ जप्त करीत मेहमूद हनीफ पटेल (रा.मेहरुण, ता.जळगाव) यास अटक केली आहे. आरोपीने अंमली पदार्थ साथीदार अरमान चिंधा पटेल (रा.शेरा चौक मेहरुण, जळगाव) याच्याकडून विक्रीसाठी आणल्याची कबुली दिल्याने दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

गोपनीय माहितीवरून कारवाई
मेहमुद हनीफ पटेल हा त्याच्याजवळ असलेला अंमली पदार्थ जे.के.पार्क परिसरातील स्विमींग पुलाजवळ विक्रीसाठी आणणार असल्याची माहिती हवालदार अकरम शेख यांना समजली होती. त्या माहितीच्या आधारे एलसीबी आणि एमआयडीसी पोलिसांच्या पथकाने कारवाई करीत आरोपीला अटक केली व अंमली पदार्थ साथीदार अरमान चिंधा पटेल (रा.शेरा चौक मेहरुण, जळगाव) कडून आणल्याने दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
यांनी केली कारवाई
ही कारवाई जळगाव स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक राहुल गायकवाड, एमआयडीसी पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक बबन आव्हाड, एपीआय गणेश वाघ, एलसीबीचे पोलिस उपनिरीक्षक शरद बागल, सहायक फौजदार अतुल वंजारी, हवालदार अकरम शेख, विजय पाटील, प्रवीण भालेराव, सलीम तडवी, किशोर पाटील, कॉन्स्टेबल गोपाल पाटील, रवींद्र कापडणे, सिध्देश्वर डापकर, रवींद्र चौधरी, महेश सोमवंशी आदींनी ही कारवाई केली.
आरोपी सुरत पोलिसांच्या ताब्यात
दोन आठवड्यांपुर्वी गुजरात पोलिसांना हवा असलेला अंमली पदार्थाच्या गुन्ह्यातील पसार आरोपी नाझीम रशीद कुरेशी याला देखील स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक करीत सुरत शहर क्राईम ब्रँचच्या ताब्यात दिल्याचे सूत्रांनी सांगितले.