भुसावळ (23 सप्टेंबर 2025) : जीएसटी कपातीची घोषणा होताच सोमवारी नवरात्रीच्या पहिल्याच माळेला दुचाकींची विक्री दुपटीने वाढली. शहरातील विविध कंपन्यांच्या शो रुममधून दिवसभरात 260 दुचाकींची विक्री झाली. गतवर्षी ही संख्या 100 ते 130 पर्यंत होती. यासोबतच अनेकांनी दसर्यासाठी बुकिंगही केली.

शहरात 188 मंडळांचा सहभाग
सोमवारी शहर व ग्रामीण भागातील तब्बल 310 मंडळांनी घटस्थापना केली. यात शहरातील 188 मंडळांचा समावेश आहे. घट स्थापनेमुळे शहराच्या बाजारात सकाळपासून उत्साह होता. पितृपक्षामुळे गेल्या पंधरवड्यापासून वाहन, सोने, कपडे, इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंची खरेदी काहीशी मंदावली होती.
नवरात्रोत्सवाच्या पहिल्याच दिवसापासून ही खरेदी व परिणामी बाजारातील उलाढाल वाढली. पहिल्याच माळेला शहरात तब्बल 260 दुचाकींची विक्री झाली. त्यातून अडीच कोटी रुपयांची उलाढाल झाली. साधारण एक लाख रुपये किंमतीची दुचाकी इन्शुरन्स, टॅक्स आदी खर्च समाविष्ट करीत एक लाख 10 हजार रुपयांपर्यंत होती. जीएसटी कपातीने वाहनाची मूळ किंमत तसेच इन्शुरन्स व टॅक्समध्येही घट झाली. यामुळे सरासरी 10 ते 11 हजार रुपये कमी झाले. ग्राहक या फायद्यासाठी महिनाभर थांबून होते. यामुळे जीएसटी कपातीच्या पहिल्याच दिवशी खरेदी वाढली.
दुर्गोत्सवात यंदाही उंच मूर्तींची क्रेझ कायम आहे. बहुतांश मोठ्या मंडळांनी 18 ते 22 फूट उंच मूर्तींची स्थापना केली. देवीच्या विविध रुपातील या मूर्ती अतिशय सुंदर आहेत. या पार्श्वभूमीवर मिरवणूक मार्गावरील अडथळा ठरणार्या केबल देखील हटवल्या जातील. योगेश चंदन, व्यवस्थापक, बजाज शोरुम, जळगाव रोड
एक लाखांचे वाहन, 11 हजार फायदा
झेंडू फुले, पूजासाहित्य, घटला मागणी सोमवारी सकाळपासून बाजारात गर्दी होती. झेंडूच्या फुलांची सर्वाधिक विक्री झाली. 60 रुपये किलोचे दर होते. मातीचे घट, पूजासाहित्य, धूप, अगरबत्ती, गुग्गुळ, लोभान, कापूर, गायीच्या शेणाच्या गोवर्यांची ग्राहकांनी खरेदी केली. ग्रामीण भागातील अनेक मंडळे शहरातील विक्रेत्यांकडे दुर्गा मातेची मूर्ती खरेदीसाठी आले होते.