भुसावळ (23 सप्टेंबर 2025) : शहरातील सुवर्णकार समाजातील महिलांसाठी होम मिनिस्टर स्पर्धेचे नवअहिर सुवर्णकार समाज मंडळार्फे रविवार, 28 सप्टेंबर रोजी दुपारी दोन वाजता जामनेर रोडवरील अहिल्यादेवी विद्यालयाच्या सभागृहात आयोजन करण्यात आले आहे.

स्पर्धेत सहभागासाठी बुधवार, 24 रोजी सायंकाळी सात वाजेपर्यंत सहभागाचे अंती मुदत आहे. स्पर्धेतील प्रथम विजेत्याला आकर्षक पैठणी, द्वितीय पारितोषिक आकर्षक नेकलेस तर तृतीय विजेत्याला आकर्षक बांगड्या भेट देण्यात येतील तसेच अन्य इतर बक्षिसे सुद्धा देण्यात येणार आहेत.
समाजातील अधिकाधिक महिलांनी सहभाग नोंदवावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. नोंदणीसाठी राजेंद्र ईश्वरशेठ पारोळेकर (9922760672), कमलेश छगनशेठ निकुंभ (7020206852) या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले.