अनुभूती इंग्लिश मिडीयम स्कूलच्या विद्यार्थ्यांचा सलग तिसर्‍यांदा खो-खो स्पर्धेत विजेतेपद

Anubhuti English Medium School students win Kho-Kho tournament for the third consecutive time जळगाव (22 सप्टेंबर 2025) : महानगरपालिकास्तरावरील आंतरशालेय खो-खो स्पर्धा 21 ते 22 सप्टेंबर दरम्यान जिल्हा क्रीडा मैदानावर पार पडल्या. यामध्ये महापालिकेत शाळांनी सहभाग घेतला होता. 17 वर्षांखालील मुलांच्या गटात अनुभूती इंग्लिश मिडीयम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले.

सलग तिसर्‍यांदा विजेतेपद पटकावून विक्रम रचला आहे. विद्यार्थ्यांची कामगिरी ही सर्व विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी असून शाळेसाठी गौरवशाली क्षण आहे. विद्यार्थ्यांना नेहमी प्रोत्साहन देण्याची भूमिका व्यवस्थापनाची असल्यानेच हे यश मिळाल्याची भावना खेळाडू व प्रशिक्षकांमध्ये आहे. क्रीडा शिक्षिका श्वेता कोळी व आकाश धनगर यांनी विद्यार्थ्यांना मार्दर्शन केले. अनुभूती इंग्लिश मिडीयम स्कूलचे अध्यक्ष अतुल जैन, संचालिका निशा जैन, मुख्याध्यापिका रश्मी लाहोटी यांच्यासह मनोज दाडकर, रूपाली वाघ व शिक्षकांनी कौतूक केले.