Mother and daughter commit suicide by throwing themselves under a train in Nashirabad नशिराबाद (23 सप्टेंबर 2025) : तांदुळ आणण्यासाठी बाहेर पडते, असे सांगून सहा वर्षीय मुलीला घेवून निघालेल्या नशिराबादच्या माय-लेकींनी धावत्या रेल्वेखाली आत्महत्या केली. ही घटना सोमवार, 22 सप्टेंबर रोजी सायंकाळी भादली रेल्वे पुलाजवळ घडली. मनीषा चंद्रकांत कावळे (28) व गौरी चंद्रकांत कावळे (6) असे मृत माय-लेकीचे नाव आहे. आत्महत्येचे ठोस कारण अद्याप समोर आलेले नाही. नशिराबाद पोलिसात याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

महिलेने उचलले टोकाचे पाऊल
नशिराबाद शहरातील भवानी नगरात मनीषा कावळे या आपल्या पती चंद्रकांत आणि दोन मुलींसोबत वास्तव्यास होत्या. पती चंद्रकांत हे एमआयडीसीतील एका चटई कंपनीत कामाला सोमवारी दुपारी दोनच्या सुमारास पती नोकरीवर मनीषा यांनी लहान मुलगी गौरीसह गावातील एका ओळखीच्या बाईकडून रेशनचा तांदूळ आणायला जात असल्याचे सांगून घराबाहेर पडल्या.
माय-लेकी संध्याकाळपर्यंत त्या परत न आल्याने चंद्रकांत यांना चिंता वाटू लागली. त्यांनी पत्नी आणि मुलीचा शोध सुरू केला मात्र, त्या दोघींचाही काही ठावठिकाणा लागला नाही. भादली रेल्वे पुलाजवळ एक महिला आपल्या लहान मुलीसह रेल्वेखाली आल्याची माहिती पोलिसांना मिळाली.
पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद
पोलिस कॉन्स्टेबल रूपेश साळवे आपल्या सहकार्यांसह घटनास्थळी पोहोचले. त्यांनी मृतदेहाची ओळख पटवली असता, ते मनीषा आणि गौरी असल्याचे समोर आले. या घटनेमुळे कावळे कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला. दरम्यान, विवाहितेने मुलीसह आत्महत्या का केली? याचे कारण अद्याप पोलिसांनाही कळाले नसल्याचे सूत्रांनी सांगितले.