Prize distribution ceremony of Late Babasaheb K. Narkhede Memorial State Level Competition at K. Narkhede School, Bhusaval भुसावळ (23 सप्टेंबर 2025) : स्व.बाबासाहेब के.नारखेडे यांच्या 45 व्या पुण्यस्मरणानिमित्त राज्यस्तरीय निबंध लेखन, वक्तृत्व व सुगम संगीत स्पर्धा तर शिक्षकांसाठी कथा व काव्य लेखन स्पर्धा तसेच नवसाहित्यिकांसाठी कथासंग्रह, काव्यसंग्रह व कादंबरी राज्य पुरस्कार पारितोषिक वितरण व पालवी प्रकाशन समारोह शहरातील प्रभाकर हॉल्मध्ये झाला.

यांची होती उपस्थिती
अध्यक्षस्थानी डॉ.मकरंद नारखेडे होते. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठ, सोलापुरचे डॉ.प्रकाश महानवर प्रमुख अतिथी होते. स्पर्धेत 400 विद्यार्थी स्पर्धक तसेच 110 नवसाहित्यिका सहभागी झाले. प्रस्ताविक विद्यालयाचे मुख्याध्यापक वाय.एन.झोपे यांनी केले. त्
कार्यक्रमात विद्यालयाच्या पालवी या वार्षिक नियतकालिकेचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर विजयी स्प़र्धकांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले. याप्रसंगी विजेत्या स्पर्धकातील नमूना वक्तृत्व व सुगम संगीत सादर करण्यात आले.
रोज नवीन काहीतरी शिका
डॉ.प्रकाश महानवर यांनी भाषणातून विद्यार्थ्यांनी मेहनत करून पुढे जावे व रोज काहीतरी नवीन शिकायला हवे, असे आवाहन केले. मोबाईलचा जास्त वापर टाळा व पुस्तक वाचन करा, गुरू-आई-वडिल यांचा सन्मान करा, पर्यावरणाची काळजी आम्ही सर्वांनी घेतली पाहिजे.
क्रीडा क्षेत्रात भरीव कामगिरी केलेल्या विद्यार्थ्यांचा तसेच एन.पी.नेहेते व प्रदीप सपकाळे, नवीन नेमाडे यांचा प्रमुख अतिथी डॉ.प्रकाश महानवर यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला. याप्रसंगी विद्यालयातील उपक्रमशील ग्रंथपाल व्ही.टी.भंगाळे यांना वॉशिंगटन येथील आंतरराष्ट्रीय विद्यापीठामार्फत मिळालेल्या डॉक्टरेट पदवीबद्दल प्रमुख अतिथी, कुलगुरू पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर विद्यापीठ सोलापूरचे डॉ.प्रकाश महानवर यांच्याहस्ते सन्मान करण्यात आला.
स्पर्धाप्रमुख नेहा पाटील व वार्षिक नियतकालिक पालवी संपादक महेश सुरवाडे यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानीत करण्यात आले. कार्यक्रमाध्यक्ष डॉ.मकरंद नारखेडे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून विद्यार्थ्यांना जीवनात मेहनत करा व तंत्रज्ञानाचा वापर करण्याचे आवाहन केले.
यांची होती उपस्थिती
कार्यक्रमाला संस्थाध्यक्ष डॉ.मकरंद नारखेडे, संस्थेचे सेक्रेटरी पी.व्ही.पाटील, ऑ.जॉ.सेक्रेटरी प्रमोद नेमाडे, संस्था सदस्य विकास पाचपांडे, भाग्येश मकरंद नारखेडे, संदीप बिंद्रा (उद्योजक)मुंबई, संस्था सदस्य डॉ.धनंजय बोरोले, अकल्पिता बोरोले, चेतन सुहास पाटील, सकाळच्या कार्यक्रमाच्या उदघाटिका प्रा.नीलिमा वारके, पत्रकार किशोर सावळे, विद्यालयाचे मुख्याध्यापक वाय.एन.झोपे, उपमुख्याध्यापक संगीता अडकमोल, पर्यवक्षक एस.एल.राणे, एस.पी.पाठक, संस्थेच्या इतर सर्व शाखांचे मुख्याध्यापक व इतर शाखांमधील सर्व कर्मचारी तसेच राज्यभरातून आलेले स्पर्धक व मार्गदर्शक शिक्षक, संगणक विभाग प्रमुख बी.ए.पाटील, विद्यालयातील व संगणक विभागातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांची कार्यक्रमाला उपस्थिती होती.
अहवाल वाचन नेहा पाटील, सूत्रसंचालन एन.जे.खाचणे तर आभार विद्यालयाच्या उपमुख्याध्यापिका संगीता अडकमोल यांनी मानले. अतिथींचा परिचय के.एस.राणे यांनी आणि अध्यक्षांचा परिचय व्ही.एम.महाजन यांनी दिला. साहित्यिक यादी वाचन एस.डी.वासकर, पुरस्कार विजेते स्पर्धकांच्या यादीचे वाचन एस.पी.महाजन, एस.टी.चौधरी यांनी केले.