धावत्या रेल्वेखाली आल्याने जळगावातील वाल्मीक नगरातील प्रौढाचा मृत्यू

Jalgaon rickshaw driver dies after being hit by train जळगाव (24 सप्टेंबर 2025) : जळगाव शहरातील असोदा रेल्वेउड्डाण पुलाखाली धावत्या रेल्वेखाली अनोळखी प्रौढाचा मृत्यू झाला. याबाबत शनीपेठ पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. ज्ञानेश्वर सुदाम पाटील (55, रा.वाल्मीक नगर, जळगाव) असे मयताचे नाव आहे.

काय घडले प्रौढासोबत ?
ज्ञानेश्वर पाटील हे वाल्मीक नगरात आपल्या पत्नी आणि दोन मुलांसह वास्तव्याला होते. रिक्षा आणि खाजगी कंपनीत काम करून ते आपला उदरनिर्वाह करत होते. दरम्यान सोमवारी रात्री ते घरात कोणाला काही न सांगता घरातून निघून गेले होते. त्यानंतर रात्री 10 वाजेच्या सुमारास त्यांचा मृतदेह आढळून आला होता. यावेळी शनिपेठ पोलिसांनी धाव घेऊन सुरुवातीला अनोळखी म्हणून पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

त्यानंतर बुधवार, 24 सप्टेंबर रोजी सकाळी सात वाजता मयत हे ज्ञानेश्वर पाटील असल्याचे निष्पन्न झाले त्यामुळे त्यांच्या नातेवाईकांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात धाव घेतली आणि ओळख पटवली. दरम्यान सकाळी 11 वाजता शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.