भुसावळात महिलेवर अत्याचार : आरोपीला पोलिस कोठडी

‘That’ active woman in Bhusawal was tortured ; Accused remanded in custody for five days भुसावळ (24 सप्टेंबर 2025) : शहरातील एका भागातील 39 वर्षीय गतिमंद महिलेवर घराजवळच राहणार्‍या संशयीताने अत्याचार केल्याची संतापजनक घटना मंगळवार, 23 सप्टेंबर रोजी दुपारी 1.15 वाजता समोर आली होती. यावेळी परिसरातील नागरिकांना हा प्रकार लक्षात आल्यानंतर आरोपी पसार झाला होता तर जमावाने आरोपीच्या घराची तोडफोड केली होती. आरोपीविरोधात गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यास अटक करण्यात आली व बुधवारी न्यायालयाने आरोपीला पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.

काय घडले गतिमंद महिलसोबत ?
भुसावळ शहर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एका भागात 39 वर्षीय गतिमंद महिला वास्तव्यास आहे. महिलेच्या घरात कुणी नसल्याची संधी साधून घराशेजारीच राहणारा संशयीत इम्रान ईमाम पिंजारी उर्फ इमू (भुसावळ) याने महिलेवर बळजबरी करीत अत्याचार केला व हा प्रकार गल्लीतील एका तरुणाच्या लक्षात आल्यानंतर त्याने धाव घेतल्यानंतर संशयीत पसार झाला. यावेळी संशयीताच्या घरी गेल्यानंतर त्याने उलट शिविगाळ करीत पळ काढला. यानंतर नागरिकांनी आरोपी इमू पिंजारीच्या घराची तोडफोड केली.

संशयीताविरोधात अत्याचाराचा गुन्हा
गतिमंद महिलेवर अत्याचार केल्याप्रकरणी आरोपी इम्रात इमाम पिंजारी विरोधात अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला व आरोपीला मंगळवारी रात्रीच अटक करण्यात आली. बुधवारी भुसावळ सत्र न्यायालयात हजर केल्यानंतर न्यायालयाने त्यास पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. तपास पोलिस निरीक्षक उद्धव डमाळे करीत आहेत.