अमळनेरात रेल्वे कर्मचार्‍याकडे दरोडा : चाकू दाखवत लूटला ऐवज

Amalner shaken : Robbery of lakhs at knifepoint in the early morning अमळनेर (25 सप्टेंबर 2025) : अमळनेरातील रेल्वे कर्मचार्‍याकडे भल्या पहाटे दरोडा पडल्याने शहरात मोठी खळबळ उडाली आहे. दरोडेखोरांनी चाकूचा धाक दाखवत सुमारे पाच तोळे सोने व 30 हजारांची रोकड लूटल्याची माहिती आहे. हा दरोडा गुरुवार, 25 सप्टेंबर रोजी पहाटे पाच वाजेच्या सुमारास पडला.

काय घडले अमळनेर शहरात ?
अमळनेरच्या अयोध्या नगर, बंगाली फाईल भागात दीपक पुंडलिक पाटील हे वास्तव्याला असून ते रेल्वेत तांत्रिक म्हणून नोकरीला आहेत. गुरुवारी पहाटे पाच वाजता ते नोकरीला जायला निघाताच त्यांच्या घरात चार अज्ञात चोरट्यांनी हातात चाकु घेऊन प्रवेश केला. घरातील व्यक्तीला चाकू लावून घरातील सामान अस्ताव्यस्त करून कपाटातील सुमारे पाच ते सहा तोळे सोने तसेच अंदाजे 30 हजार रुपये रोख लुटून नेले.

पोलिसांची धाव
भल्या पहाटे पडलेल्या दरोड्यानंतर अमळनेर पोलिस निरीक्षक दत्तात्रय निकम, पोलिस उपनिरीक्षक नामदेव बोरकर, हेड कॉन्स्टेबल मिलिंद सोनार, विनोद संदानशीव, उदय बोरसे, प्रशांत पाटील, गणेश पाटील, विनोद सोनवणे, सुनील पाटील यांनी घटनास्थळी भेट दिली. ठसे तज्ज्ञांना बोलावण्यात आले असून गुन्हा दाखलची प्रक्रिया सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले.