Terrible triple accident near Amalner : Couple in Ekrukhi killed, one seriously injured अमळनेर (26 सप्टेंबर 2025) : अमळनेर तालुक्यातील अपघाताची धक्कादायक बातमी समोर आली आहे. भरधाव आयशर वाहन व दोन दुचाकींमध्ये झालेल्या अपघातात एकरुखी येथील दाम्पत्य जागीच ठार झाले तर एक जण गंभीर जखमी झाला. हा अपघात हेडावे रस्त्यावर गुरुवार, 25 रोजी संध्याकाळी सात वाजेच्या सुमारास घडला.

दाम्पत्य अपघातात जागीच ठार
हेडावे रस्त्यावर गुरुवार, 25 रोजी संध्याकाळी सात वाजेच्या सुमारास दोन मोटारसायकल आणि आयशर अशा तिहेरी अपघात एकरूखी येथील विशवनाथ हिंमत भील (30) व ज्योती विश्वनाथ भील (25) यांचा जागीच मृत्यू झाला तर दुसरा मोटारसायकल चालक बाळू साहेबराव पाटील (50) हा जबर जखमी झाला
अपघातानंतर अमळनेर पोलिस निरीक्षक दत्तात्रय निकम यांच्या मार्गदर्शनाखाली तातडीने पथकाने धाव घेतली. परिसरातील नागरिकांच्या मदतीने जखमीला उपचारासाठी आणि मृतांचे शव विच्छेदनसाठी ग्रामीण रुग्णालयात रवाना करण्यात आले.
या अपघातात मयत झालेला विश्वनाथ भिल हा एकुलता एक असून अपघातात त्याची पत्नीही मरण पावल्याने गावात शोककळा पसरली आहे. विश्वनाथचे आईवडील वयोवृद्ध असून त्याच्या पश्चात 9 व 7 वर्षाचा मुलगा आहे. कमावता एकुलता एक मुलगा गेल्याने तसेच चिमुकल्याने मातृ-पित्रृ छत्र हरपल्याने कुटूंब उघड्यावर आले आहे.