The body of an old woman was found lying in a coffin in Jalgaon for the second consecutive day. जळगाव (26 सप्टेंबर 2025) : जळगावात धूम स्टाईल चैन व पोत लांबवण्याच्या घटना वाढल्याने महिलावर्गात भीती पसरली आहे. वृद्धेच्या गळ्यात पोत अज्ञात चोरट्यांनी हिसकावून पळ काढल्याची धक्कादायक घटना बुधवार, 24 सप्टेंबर रोजी रात्री 9 वाजेच्या सुमारास घडली. रामानंद नगर पोलिसात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

काय घडले जळगावात ?
लिलाबाई केशव पाटील (77, रा. गुलमोहर कॉलनी, जळगाव) या त्यांच्या नातवंडांसोबत गुलमोहर कॉलनीमध्ये राहतात. त्यांची नातवंडे शिक्षणानिमित्त शहरात खोली घेऊन राहतात. लिलाबाई पाटील या नेहमीप्रमाणे बुधवारी रात्री 9 वाजेच्या सुमारास त्यांच्या घराजवळच एका अन्य महिलेसोबत शतपावली करीत असताना साईबाबा मंदिराजवळून जात असताना सेंट जोसेफ शाळेच्या दिशेने दुचाकीवरून दोन तरुण भरधाव वेगाने आले. दुचाकीवर मागे बसलेल्या तरुणाने क्षणार्धात लिलाबाई पाटील यांच्या गळ्यातील सोन्याची पोत खेचली आणि दोघांनीही अत्यंत वेगाने दुचाकी घेऊन घटनास्थळावरून पोबारा केला.
हा प्रकार इतक्या अचानक घडला की, लिलाबाई पाटील किंवा त्यांच्यासोबत असलेल्या महिलेला कोणताही प्रतिकार करण्याची संधी मिळाली नाही. चोरट्यांनी हिसकावलेली सोनपोत सुमारे दोन तोळे वजनाची असल्याचे सांगण्यात आले.
अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल
वृद्धेच्या गळ्यातील सोन्याची पोत चोरीला गेल्याचे समजताच परिसरात एकच खळबळ उडाली. या घटनेची माहिती तात्काळ रामानंद नगर पोलिसांना देण्यात आली. माहिती मिळताच पोलीस निरीक्षक राजेंद्र गुंजाळ आणि त्यांचे सहकारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी परिसराची पाहणी केली आणि लिलाबाई पाटील यांच्याकडून घटनेची माहिती घेतली. याप्रकरणी गुरुवारी मध्यरात्री एक वाजता लीलाबाई पाटील यांच्या तक्रारीवरून रामानंद नगर पोलिसात दोन अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.