परप्रांतीयांना जंगलात बोलावून लूटमारी करणारी टोळी मुक्ताईनगर पोलिसांच्या ताब्यात

Muktainagar police arrest gang that lured migrants to the forest and looted them मुक्ताईनगर (26 सप्टेंबर 2025) : मुक्ताईनगर पोलिसांनी लूटमार करणार्‍या टोळीच्या मुसक्या बांधल्या आहेत. आरोपी दुतोंडी मांडुळासह कासव व अन्य वन्य प्राणी देण्याच्या तसेच दुप्पट नोटांच्या आमिषाने सोशल मिडीयावर जाहिरात करून परप्रांतीयांना जंगलात बोलावून लुटत असल्याचा संशय आहे. आरोपींच्या अटकेनंतर काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.

गोपनीय माहितीवरून कारवाई
मुक्ताईनगर पोलिस निरीक्षक आशिष कुमार अडसूळ यांना टोळीबद्दल माहिती मिळाल्यानंतर त्यांनी कारवाईचे निर्देश दिले. बुधवार, 24 सप्टेंबर रोजी रात्री दहा ते साडेबारा वाजेच्या दरम्यान ही कारवाई
डोलारखेडा फाटा ते पुर्णाड फाटादरम्यान करण्यात आली.

या आरोपींना बेड्या
याप्रकरणी पवन दिनेश गौर (आडगाव खुर्द, ता.हरदा, जि.हरदा), अरविंद कुमार काशीराम राठोड (हरदा), राजेश शंकरलाल साहू (शहापूर, जि.बर्‍हाणपूर), चेतन सुरेश श्रीवास्तव (लालबाग, जि.बर्‍हाणपूर), गोपाल श्रीराम यादव (शिवनी माधवा, ता.नर्मदापूर, मध्य प्रदेश), चेतन गोविंद यादव (न्यू कॉलनी, बर्‍हाणपूर) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत.

तपास पोलिस निरीक्षक आशिषकुमार अडसूळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक नयन पाटील करत आहे.