Retired police officer’s son’s bravery : Photographer arrested a young woman and her friend while showing them a pistol to get them to work as call girls नाशिक (27 सप्टेंबर 2025) : नाशिकमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. निवृत्त पोलिस अधिकार्याच्या मुलाने पिस्टल दाखवत एका व्यावसायिक फोटोग्राफर तरुणी व तिच्या मैत्रिणीला हॉटेलमध्ये जबरदस्तीने डांबत लूटले तसेच कॉल गर्ल्सचे काम कर म्हणून धमकावल्याची बा समोर आली आहे. या प्रकरणी म्हसरूळ पोलिसात हॉटेल चालकासह त्याच्या साथीदाराविरुद्ध गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात आल्यानंतर संशयित हॉटेल चालक सौरभ संजय देशमुख आणि त्याचा साथीदार वेटर मोहीत मिलिंद ताम्हाणे यांना अटक करण्यात आली.

काय घडले तरुणीसोबत ?
संशयित सौरभ देशमुख याचे ‘कॅटल हाउस’ नावाचे हॉटेल असून, त्याच्यावर यापूर्वीही बेकायदेशीर कृत्यांबाबत पोलिसांनी कारवाई केली आहे. विशेष म्हणजे सौरभ हा एका निवृत्त पोलिस अधिकार्याचा मुलगा आहे. त्याच्याकडून हॉटेलमध्ये अनेकदा अनैतिक व गैरकायदेशीर व्यवहार होत असल्याच्या तक्रारी आहेत शिवाय पोलिसांपासून बचावासाठी तो आणि त्याचे कर्मचारी वैयक्तिक वॉकी-टॉकी वापरत असल्याचेही उघड झाले आहे.
पीडित तरुणी आणि तिच्या मैत्रिणीचा वेटर मोहीत ताम्हाणेशी पूर्वीपासूनच परिचय होता. त्याने 2020 पासून त्यांच्याकडून आर्थिक मदत घेतली होती. एके दिवशी तो ‘कॅटल हाउस’ हॉटेलमध्ये असल्याची माहिती मिळाल्यावर त्या दोघी तरुणी व त्यांचा एक मित्र तिथे गेले. तेव्हा हॉटेलमालक सौरभ देशमुख याने त्यांना थेट धमकी देत म्हटले की, तुम्ही इथे येऊन मोठी चूक केली आहे. माझ्या हॉटेलमध्ये कॉलगर्ल्स पुरवल्या जातात, आता तुम्ही दोघीही तेच काम करा. चांगले पैसे देईन, आणि मोहीतकडून पैसे मागण्याची गरजही भासणार नाही, असे म्हटले.
अनपेक्षित आणि धक्कादायक प्रसंगानंतर तिघांनी तिथून पळण्याचा प्रयत्न केला मात्र देशमुख याने त्यांच्यावर पिस्तूल रोखून त्यांना बंद खोलीत डांबून ठेवले. एवढ्यावरच न थांबता त्याने जिवे मारण्याची धमकी दिली आणि त्यांच्या जवळील 21 हजार रुपये काढून घेतले. अखेर पहाटे साडेपाचच्या सुमारास त्यांना सोडण्यात आले.
काही दिवसांनी मोहीत ताम्हाणे याने व्हॉट्सपवरून पुन्हा धमकीचे मेसेज पाठवले त्यामुळे पीडित तरुणींनी अखेर धैर्य करून पोलिसांत तक्रार दाखल केली. या प्रकरणी विनयभंग, जबरदस्ती, डांबून ठेवणे, दरोडा, धमकी देणे अशा विविध गंभीर कलमांन्वये गुन्हा नोंदविण्यात आला. पोलिसांच्या प्राथमिक तपासात देशमुख व ताम्हाणे यांच्यावर पूर्वीही असेच आरोप असल्याचे स्पष्ट झाले आहे. ‘एबीपी माझा’ने या संदर्भातील वृत्त ऑनलाईन दिले आहे.