लक्ष्मण हाकेंच्या कारवर नगरमध्ये जमावाचा काठ्यांनी हल्ला, गाडीच्या काचा फुटल्या

Laxman Hake’s car was attacked with sticks by a mob in the city, the car’s windows were broken अहमदनगर (27 सप्टेंबर 2025) : ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांच्या वाहनावर अज्ञात तरुणांनी हल्ला अहिल्यानगर जिल्ह्याच्या पाथर्डी तालुक्यातील आरनगाव बाह्यवळण रस्त्यालगत हल्ला केल्याचा प्रकार समोर आला आहे. या हल्ल्यात वाहनाच्या काचा फुटल्या असून या प्रकारानंतर मोठी खळबळ उडाली आहे.

नाश्त्यासाठी थांबल्यानंतर घडली घटना
शुक्रवारी सकाळी लक्ष्मण हाके हे दैत्य नांदूर (ता.पाथर्डी) येथे आयोजित ओबीसी एल्गार सभेला जात सताा अहिल्यानगरजवळ नाश्ता करण्यासाठी ते थांबले. नाश्ता करून पुन्हा प्रवास सुरू करत असतानाच आरनगाव बाह्यवळण रस्त्यावर काही अज्ञात तरुणांनी त्यांच्या गाडीला अडवून अचानक काठ्यांनी हल्ला केला.

या हल्ल्यात त्यांच्या वाहनाचे मोठे नुकसान झाले तर वाहनाच्या काचा फुटल्या. सुदैवाने हाके यांना शारीरिक इजा झाली नसल्याचे प्राथमिक माहितीतून स्पष्ट झाले आहे. हल्ल्याची माहिती मिळताच स्थानिक पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून, अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.