Minor girl safe under Operation ‘Nanhe Farishte’ भुसावळ (27 सप्टेंबर 2025) : रेल्वेच्या भुसावळ विभागात ‘ऑपरेशन नन्हें फरिश्ते’अंतर्गत घरातून नाराज होऊन निघालेल्या बिहार राज्यातील 15 वर्षीय अल्पवयीन मुलीला रेल्वे अधिकार्यांनी सतर्कतेने शोधून सुरक्षितपणे बाल कल्याण समितीकडे सोपविले आहे.

रेल्वे सुरक्षा बलातर्फे माहिती देतांना सांगण्यात आले की, 23 सप्टेंबर रोजी भुसावळ रेल्वे स्थानकावर आलेल्या सचखंड एक्सप्रेस (गाडी क्र. 12716 अप) मध्ये ड्युटीवर असलेल्या टीटीई दीपक कुमार यांनी गस्ती तपासणी दरम्यान स्लीपर कोचमध्ये संशयास्पद स्थितीत एक अल्पवयीन मुलगी आढळून आली. त्यांनी तत्काळ लेखी मेमो करून पुढील कार्यवाहीसाठी ही माहिती संबंधित अधिकार्यांना दिली.
यावेळी आधार बहूउद्देशीय संस्था भुसावळचे प्रकल्प समन्वयक सुनील हिवाळे व दीपाली सुनील हिवाळे पोलिस ठाण्यात दाखल झाले.एएसआय एस.जे.दुबे यांच्या उपस्थितीत चौकशीदरम्यान मुलीने आपले नाव सोनी कुमारी (15, रा. गया, बिहार) असे सांगितले. घरच्यांवर नाराज होऊन ती कोणालाही न सांगता घरा बाहेर पडल्याचे तिने आरपीएफला सांगितले.
कागदपत्राची प्रक्रिया पूर्ण करून संबंधित मुलीला भुसावळ येथील ट्रॉमा केअर सेंटरमध्ये आरोग्य तपासणीसाठी नेण्यात आले. त्यानंतर तिला जळगाव येथील बाल कल्याण समितीकडे दाखल करण्यासाठी आधार बहुउद्देशीय संस्थेकडे सोपविण्यात आले. रेल्वे प्रशासनाच्या सतर्कतेमुळे व ऑपरेशन नन्हें फरिश्तेच्या अंतर्गत तत्परतेने मुलीस सुरक्षित ठीकाणी सोपविण्यात आल्याचे आरपीएफ निरीक्षक पी.आर.मीना यांनी सांगितले.