माहिती अधिकार दिन सोमवारी होणार

जिल्हाधिकारी, प्रांताधिकार्‍यांसह तहसील कार्यालयात आयोजन

Right to Information Day will be on Monday instead of Sunday भुसावळ (27 सप्टेंबर 2025) : यंदाचा माहिती अधिकार दिन रविवार, 28 सप्टेंबर रोजी शासकीय सुट्टीच्या दिवशी येत असल्याने हा दिवस सोमवार, 29 सप्टेंबर रोजी साजरा करण्यात येणार आहे.

राज्याचे अवर सचिव, सामान्य प्रशासन विभाग, मुंबई यांच्या पत्रान्वये हा बदल करण्यात आला आहे. सुटी असल्याने माहिती अधिकार दिन हा सोमवारी होणार आहे.

जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी भुसावळ तसेच तहसील कार्यालय भुसावळ येथे माहिती अधिकार दिनाचे आयोजन करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे भुसावळ तालुक्यातील सर्व शासकीय व निमशासकीय विभागांमध्येही हा दिन साजरा करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

या दिवशी विविध कार्यक्रमांद्वारे सामान्य नागरिकांना माहिती अधिकार कायदा व त्यातील तरतुदींबाबत मार्गदर्शन केले जाणार असून जनजागृतीवर विशेष भर दिला जाणार आहे. नागरिकांना शासनाच्या कामकाजात पारदर्शकता वाढवण्यासाठी माहिती अधिकाराचा वापर करण्याबाबत माहिती देण्यात येईल.

माहिती अधिकार दिनाच्या निमित्ताने नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या उपक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.