The marriage broke up in a month and a half, but the alimony amount made this marriage a topic of discussion everywhere. पुणे (27 सप्टेंबर 2025) : विवाह म्हणजे दोन जीवांचे मिलन अन् आयुष्यभराचा सहप्रवासही मात्र अवघ्या 45 दिवसात लग्नाची संसारवेल किरकोळ कारणाने तुटली व मिळालेल्या भरपाईने पुण्यातील महागड्या विवाहाची सर्वत्र चर्चा होत आहे

काय घडले दाम्पत्यासोबत ?
एका दाम्पत्याचा जानेवारी 2022 मध्ये विवाह झाला. लग्न अतिशय थाटामाटात झाले होते पण नवरी सासरी नांदण्यास गेल्यानंतर लग्नातील हुंडा व मानपान या मुद्यांवर कुटुंबात कुरबुरी निर्माण झाल्या. त्यानंतरही काही दिवस तसेच गेले. त्यानंतर पतीने पत्नीला ‘मला तू पसंत नाहीस, कुटुंबाच्या दबावाखाली मी हे लग्न केले’ असे टोमणे मारण्यास सुरुवात केली त्यामुळे पती-पत्नीतील मतभेद टोकाला गेले. त्यातच हा वाद चिघळल्यानंतर सासरच्या मंडळींनी एके दिवशी नवरीला थेट घराबाहेर काढले.
पत्नीच्या वकिलांनी केले समुपदेशन
या घटनेनंतर पीडित महिलेने पती, सासू, सासरा व नणंदेविरोधात भोसरी पोलिसात कौटुंबिक छळ व हिंसाचाराची तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी सविस्तर तपास करून न्यायालयात आरोपपत्र दाखल केले. मधल्या काळात पत्नीने घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला. या अर्जानंतर पत्नीची बाजू लढवणार्या वकील प्रियांका काटकर व वकील रेश्मा सोनार यांनी दोन्ही पक्षांचे समुपदेशन करून तोडगा काढण्याचा प्रयत्न केला. त्यात पतीने 45 लाख रुपयांची एकरकमी पोटगी देण्यास सहमती दर्शवली. त्याला पत्नीनेही सकारात्मक प्रतिसाद दिला.
घटस्फोटावर कोर्टाने केले शिक्कामोर्तब
त्यानंतर वर्षभरापासून एकमेकांविरोधात न्यायालयीन लढाई लढणार्या या दाम्पत्याच्या घटस्फोटावर कोर्टाने शिक्कामोर्तब केला. पत्नीच्या वकिलांनी केलेल्या समुपदेशनातून या कौटुंबिक वादात तडजोडीचा मार्ग निघाला आणि एकरकमी पोटगीच्या बदल्यात या प्रकरणाला पूर्णविराम मिळाला. या घटनाक्रमानंतर नववधूने सासरच्या मंडळीविरोधात दाखल केलेला कौटुंबिक हिंसाचाराचा गुन्हा मागे घेण्यात आला.