Prize distribution for inter-class competitions at K. Narkhede School, Bhusawal भुसावळ (27 सप्टेंबर 2025) : शहरातील के.नारखेडे विद्यालयात स्व.बाबासाहेब के.नारखेडे यांच्या 45 व्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित आंतरवर्गीय स्पर्धांचे पारितोषिक वितरण शनिवार, 27 रोजी करण्यात आले. अध्यक्षस्थानी ऑनररी जॉईंट सेक्रेटरी प्रमोद नेमाडे होते. प्रमुख विद्यालयाचे माजी विद्यार्थी व बालरोग तज्ज्ञ डॉ.समीर खानापूरकर होते.

विद्यार्थ्यांवर शुभेच्छांचा वर्षाव
मान्यवरांच्या हस्ते आय.टी.सॉफ्टफ्यूजन, इलेक्टस व्हीजन, बालवैज्ञानिक स्पर्धा, हस्तकला प्रदर्शन तसेच चित्रकला स्पर्धा या विभिन्न स्पर्धांत उल्लेखनीय यश प्राप्त करणार्या यशस्वी स्पर्धकांना पारितोषिक वितरण करण्यात आले.
विभिन्न स्पर्धा ह्या आयुष्यात आत्मविश्वास वाढवतात
डॉ.समीर खानापूरकर म्हणाले की, विभिन्न स्पर्धा ह्या आयुष्यात आपला आत्मविश्वास वाढवण्यात आपल्याला मदत करतात. प्रमोद नेमाडे यांनी सर्व स्पर्धकांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे कौतुक केले व दरवर्षी जास्तीत-जास्त संख्येने विद्यार्थ्यांनी या स्पर्धांमध्ये भाग घेतला पाहिजे, असे आवाहन केले.
यांची कार्यक्रमास उपस्थिती
सूत्रसंचालन मनीषा सोनवणे यांनी केले तसेच पारितोषिक विजेत्या स्पर्धकांच्या यादी वाचनाचे काम स्वाती इखे यांनी केले. इशस्तवन व स्वागत गीतासाठी संगीत साथ डी.एम.हेलोडे व विद्यार्थी सुदिक्षण चौधरी यांनी दिली. प्रमुख अतिथींचा परिचय इयत्ता नववीची विद्यार्थिनी जान्हवी भागवत पाटीलने दिला. मुख्याध्यापक वाय.एन.झोपे, उपमुख्याध्यापिका अडकमोल, पर्यवेक्षक एस.एल.राणे, पर्यवेक्षक एस.पी.पाठक, संगणक विभाग प्रमुख बी.ए.पाटील, संगणक विभाग व विद्यालयाचे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ संस्थेचे अध्यक्ष डॉ.मकरंद नारखेडे, उपाध्यक्ष डॉ.किशोर नारखेडे, चेअरमन श्रीनिवास एन नारखेडे, सेक्रेटरी पी.व्ही.पाटील, संस्था सदस्य विकास पाचपांडे, डॉ.संजीव एन.नारखेडे, भाग्येश नारखेडे यांनी कौतुक केले.
विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी
डॉ.समीर खानापूरकर यांनी विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करून विद्यार्थ्यांना शारीरिक मानसिक भावनिक व बौद्धिक आरोग्याविषयी अत्यंत महत्त्वपूर्ण सूचना केल्या. यशस्वीतेसाठी श्री.श.चिपळोणकर, मनोज कुलकर्णी, शैलेंद्र वासकर, शैलेंद्र महाजन, अनिल जटाळे, जी.व्ही.पाटील, संदीप पाटील, माधव गरुडे, विशाल राणे, नवीन नेमाडे, स्मिता झांबरे यांनी परिश्रम घेतले. आभार प्रदर्शन उपमुख्याध्यापिका संगीता अडकमोल यांनी मानले.