भुसावळ (29 सप्टेंबर 2025) शहरातील ताप्ती पब्लिक स्कूलच्या उपशिक्षिका तसेच समाजसेवी, विद्यार्थीप्रिय शिक्षिका पूनम विजय फालक यांना राजनंदिनी बहुउद्देशीय संस्थेमार्फत जिल्हाधिकारी कार्यालयात राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार 2025 पुरस्कार प्रदान करण्यात आला.

यांची होती उपस्थिती
राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष रविंद्रभैया पाटील, पाचोरा बाजार समितीचे संचालक शालिग्राम मानकर, संस्थाध्यक्षा संदीपाा वाघ, सिंगल वूमन फौंडेशन अध्यक्षा मनिषा चव्हाण, सामाजिक कार्यकर्त्या मनिषा पाटील यांच्याहस्ते पुरस्काराचे वितरण करण्यात आले.
विद्यार्थिप्रिय शिक्षिका
गेल्या तेरा वर्षांपासून पूनम फालक या ताप्ती पब्लिक स्कूलमध्ये कार्यरत आहेत. अनेक विद्यार्थ्यांना त्यांनी घडवले असून त्यांनी घडवलेले विद्यार्थी विविध क्षेत्रात कार्यरत आहेत. अनेक सामाजिक उपक्रमात सुद्धा त्या हिरारीरे भाग घेतात. त्याचप्रमाणे आयुर्वेदाचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी सुद्धा त्या आघाडीवर आहेत तसेच अनेक धार्मिक कार्यात सुद्धा त्या सहभाग घेतात. आज सुद्धा त्यांचे अनेक विद्यार्थी आवर्जून शिक्षक दिनाच्या दिवशी त्यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतात.
पुरस्कारानंतर शुभेच्छांचा वर्षाव
त्यांना मिळालेल्या पुरस्काराबद्दल व केलेल्या कार्याची दखल घेतल्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष मोहन फालक, चेअरमन महेश फालक, सेक्रेटरी विष्णू चौधरी, कोषाध्यक्ष संजयजी नाहाटा, सर्व पदाधिकारी व ताप्ती पब्लिक स्कूलच्या मुख्याध्यापिका निना कटलर उपमुख्याध्यापीका मनप्रीत कौर, श्रध्दाली घुले तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच श्री स्वामी समर्थ शिक्षण प्रसारक मंडळाच्या चेअरमन कांचन नेमाडे, जगन्नाथ नेमाडे, जयलक्ष्मी अॅकेडमीचे जय व लावण्या फालक तसेच अनेक मान्यवर, नातेवाईक व मित्र परिवारातर्फे त्यांचे अभिनंदन करण्यात आले.