भुसावळ (29 सप्टेंबर 2025) : जळगाव विभाग अंतर्गत आंतर महाविद्यालयीन कबड्डी स्पर्धा, जळगाव येथे प्रथम फेरीत केसीई आयएमआर महाविद्यालयाविरुद्ध शहरातील भोळे महाविद्यालयातील (10-41 स्कोअर) 31 गुणांनी भोळे महाविद्यालयाचा संघ विजयी ठरला.

द्वितीय फेरीत रावेर महाविद्यालयाविरुद्ध भोळे महाविद्यालयाचा संघ भुसावळ (13-41 स्कोअर) 28 गुणांनी विजयी ठरलाव सेमी फायनलमध्ये पोहोचला. येथे अॅड.बाहेती महाविद्यालयाशी सामना झाला व बाहेती महाविद्यालयाचा संघ अंतिम सामन्यात विजयी झाला.
प्रतीक अवसरमल, अखिलेश कुटूरवार, राज चौधरी, भावासकर सुमित, युवराज श्रीनिवास, ओम कोळी, साहिल दराडे, भूषण गुंजाळ, यश लोखंडे, यश भाई, मंथन वानखेडे, लकी तायडे यांनी उत्कृष्ट खेळ करून चतुर्थ क्रमांक मिळवून दिला. यात प्रतीक अवसरमल, अखिलेश कुटरवार यांनी सर्वोत्कृष्ट खेळी केल्याबद्दल कवयित्री बहीणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव आंतर विभागीय कबड्डी स्पर्धा, शहादा ता.नंदुरबारसाठी निवड झाली.
या यशाबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.राजू फालक यांनी खेळाडूंचाचा सत्कार केला. यावेळी क्रीडा संचालक प्रा.डॉ.संजय चौधरी, प्रा.डॉ.अनिल सावळे, प्रा.डॉ.जे.बी.चव्हाण, प्रा.डॉ.जयश्री सरोदे, प्रा.डॉ.माधुरी पाटील, प्रा.दीपक जैस्वार, प्रा.आर.डी.भोळे उपस्थित होते.