Bogus call center in Jalgaon: One accused arrested from Mumbai जळगाव (1 ऑक्टोबर 2025) : जळगावातील ललित कोल्हे यांच्या फार्म हाऊसवरील बनावट कॉल सेंटरचा पोलिसांनी पर्दाफाश करीत आठ संशयीतांना अटक केली होती. पोलिसांची पथक मुंबईत तपासासाठी गेल्यानंतर गुन्हे शाखेने इम्रान अकबर खान (29, मुंबई) या संशयीताला बेड्या ठोकल्या आहेत. संशयीतांनी फार्म हाऊसवर वायफाय कनेक्शन लावल्याची सूत्रांची माहिती आहे. संशयीतांला न्यायालयाने 7 पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

काय आहे नेमके प्रकरण ?
जळगाव शहरातील ममुराबाद रोडवरील एल.के.फार्म हाऊसवर पोलिसांनी छापा टाकून बोगस कॉल सेंटर उघडकीस आणले होते. माजी महापौर ललित कोल्हे यांच्यासह आठ जणांना अटक करण्यात आली.
जळगाव गुन्हे शाखेचे पथक अन्य संशयीतांच्या शोधासाठी मुंबईत गेल्यानंतर इम्रान अकबर खान (29, मुंबई) या संशयीताला बेड्या ठोकण्यात आल्या.
इम्रान खान हा जून महिन्यापासून जळगावात वास्तव्य करीत होता. कॉल सेंटर उभारणीमध्ये त्याने रंगरंगोटीसह वायफाय लावण्याचे काम केले असून त्याला दोन महिन्यांसाठी बक्कळ रक्कम पगारादाखल देण्यात आल्याची सूत्रांची माहिती आहे.
पोलिसांना या प्रकरणात दोन मुख्य आरोपी हवे असून त्यांच्या अटकेनंतर या प्रकरणातील अनेक खुलासे समोर येणार आहेत.