Badnera-Nashik train extended भुसावळ (2 ऑक्टोबर 2025) : गाडी क्रमांक 01211 बडनेरा-नाशिक रोड अनारक्षित दैनंदिन विशेष गाडीला आता 1 ऑक्टोबर ते 31 डिसेंबर 2025 दरम्यान मुदतवाढ देण्यात आली आहे. या काळात या गाडीच्या 92 फेर्या होणार आहेत.

गाडी 01212 नाशिक रोड-बडनेरा अनारक्षित विशेष गाडी जी पूर्वी 30 सप्टेंबरपर्यंत चालविण्यात येणार असलीतरी तिलाही आता 1 ऑक्टोबर ते 31 डिसेंबर 2025 पर्यंत मुदतवाढ मिळाली आहे. प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.