राष्ट्रपिता महात्मा गांधी ताप्ती पब्लिक स्कुलमध्ये अभिवादन

Mahatma Gandhi Jayanti celebrated at Tapti Public School in Bhusawal भुसावळ (3 ऑक्टोबर 2025) : शहरातील ताप्ती पब्लिक सीबीएसई इंग्लिश मीडियम स्कुलमध्ये राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी स्कुलच्या प्रिंसीपल नीना कटलर यांनी द्वीप प्रज्वलन करीत राष्ट्रपिता गांधीजींच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला.

यांची होती उपस्थिती
प्रसंगी व्हाईस प्रिंसीपल मनप्रीत कौर, श्रद्धाली घुले यांच्यासह शिक्षकवर्ग व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. विद्यार्थिनींनी भाषण व काव्य वाचन केले. यावेळी शाळेच्या प्रिन्सिपल निना कटलर यांनी महात्मा गांधी यांच्या जीवनावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन प्रतिभा काकडे तर आभार जयश्री मोरेस्कर यांनी मानले.