किनगाव येथे शिवकालीन माती कलशयात्रा; माजी आमदार लता सोनवणे यांचा सहभाग

यावल (प्रतिनिधी) : यावल तालुक्यातील किनगाव येथे श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराज स्मारक कृती समितीच्या वतीने भव्य कलशयात्रेचे आयोजन करण्यात आले. या यात्रेमध्ये माजी आमदार लता सोनवणे यांनी सहभाग घेतला.
ही कलशयात्रा नियोजित छत्रपती शिवाजी महाराज अश्वारूढ पुतळा स्थळी पार पडली. या ठिकाणी राज्यातील विविध गडकोटांवरून आणलेली पवित्र माती एकत्र करून पूजन करण्यात आले. ऐतिहासिक वारसा जपणारा आणि भावनात्मक निष्ठा व्यक्त करणारा हा कार्यक्रम उत्साहात पार पडला.
कार्यक्रमाला माजी जि.प. सदस्या रत्ना चौधरी, सरपंच स्नेहल चौधरी, माजी सरपंच भारती प्रशांत पाटील, रोहिणी पाटील, किनगाव खुर्दच्या सरपंच रुपाली कोळी, जयश्री पाटील, पोलिस पाटील रेखा नायदे यांनी उपस्थित राहून आपला सहभाग नोंदवला.
तसेच माजी आमदार रमेश चौधरी, बाजार समितीचे संचालक सूर्यभान पाटील, तसेच स्मारक कृती समितीचे अध्यक्ष मोहन पाटील व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.