स्टेट बँक ऑफ इंडिया व चोपडा सामान्य रुग्णालयाच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिर 

स्टेट बँक ऑफ इंडिया व चोपडा सामान्य रुग्णालयाच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिर 
चोपडा | दि. १५ जून २०२५ | प्रतिनिधी

स्टेट बँक ऑफ इंडियाच्या स्थापनेला ७० वर्षे पूर्ण झाल्याच्या औचित्याने, चोपडा शाखा आणि चोपडा सामान्य रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने शासकीय रुग्णालय परिसरात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. सकाळी नऊ वाजता सुरू झालेल्या या शिबिरात चोपडा शहरातील अधिकारी, कर्मचारी व सामान्य नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत समाजाचे देणे लागते या भावनेतून एकूण ७१ रक्तदात्यांनी रक्तदान केले.

रक्तदान शिबिराचे आयोजन यशस्वी होण्यासाठी स्टेट बँक ऑफ इंडियाचे सहाय्यक महाप्रबंधक धर्मेंद्र कुमार, प्रकाश बिशवाल, आशिष जाधव तसेच जळगाव येथील प्रशासनिक कार्यालयाचे मार्गदर्शन लाभले. शिबिराचे आयोजन व नियोजन सुसुत्रतेने पार पाडण्यासाठी गजानन पाटील, संकेत खोडवे, विशाल तांगडे, वाल्मीक बागुल, रवी हरणे यांच्यासह चोपडा शाखेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मेहनत घेतली.

चोपडा सामान्य रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक सुरेश पाटील

Go back

Your message has been sent

Warning
Warning
Warning
Warning

Warning.

, दीपक पगारे आणि इतर वैद्यकीय कर्मचारी यांनी शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी विशेष सहकार्य केले. एकात्मिक सहभागातून पार पडलेले हे रक्तदान शिबिर समाजासाठी प्रेरणादायी ठरले.