दोन वर्षांसाठी हद्दपार असलेला संशयित एलसीबीच्या जाळ्यात

जळगाव (प्रतिनिधी) :
दोन वर्षांच्या कालावधीसाठी जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आलेला संशयित युवक शहरात आढळून आल्याने एलसीबीच्या पथकाने त्याला तात्काळ अटक केली. ही कारवाई १४ जून रोजी रात्री दहाच्या सुमारास करण्यात आली.
अंकुश मधूकर सुरवाडे (वय २६, रा. गेंदालाल मिल) असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव असून, तो न्यायालयाच्या आदेशानुसार जळगाव जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आलेला होता. मात्र, कोणतीही अधिकृत परवानगी न घेता तो जिल्ह्यात वावरताना आढळून आला.
या कारवाईत एलसीबीचे सफौ अतुल वंजारी, अक्रम शेख, विजय पाटील, नितीन बाविस्कर, प्रवीण भालेराव, रविंद्र कापडणे यांच्या पथकाने सहभाग घेतला. सुरवाडे याची चौकशी केली असता त्याच्याकडे जिल्ह्यात परतण्यासंदर्भात कोणतीही अधिकृत मंजुरी नसल्याचे निष्पन्न झाले.
या प्रकरणी त्याच्याविरोधात संबंधित कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे. एलसीबीच्या तात्काळ आणि अचूक कारवाईमुळे हद्दपार गुन्हेगारांवरील नियंत्रण पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.