नरकापेक्षा भयंकर यातना! ज्याने सात जन्माचं वचन दिलं त्यानेच ‘त्या’ व्यवसायासाठी पाठवलं, नकार देताच.. बुलढाणा हादरलं.

बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव येथे एका 32 वर्षीय महिलेला तिच्या पतीने, सासूने आणि नणंदेने वेश्या व्यवसाय करण्यास भाग पाडले. नकार दिल्यावर तिला मारहाण केली. न्यायालयाने आरोपींना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.महिला सुरक्षित राहाव्यात याकरता अनेक उपाययोजना कायदे कठोर करण्याची भाषा वारंवार केली जाते. दिवसेंदिवस मुख्यतः नवविवाहित महिलांना घरातूनच असुरक्षित असल्याच्या भावना समोर येत आहे. ग्रामीण भाग असो की शहरी मात्र कुठेच त्या सुरक्षित नाही आणि जेव्हा लग्न झाल्यानंतर स्वतःचे हक्काचे घर सोडून ते आपल्या नवीन संसाराचे स्वप्न थाटतात तिथे नको त्या गोष्टी त्यांना कराव्या लागतात आणि अशा वेळेस त्यांना उचलावे लागते कठोर पाऊल. मात्र यावेळेस चक्क या महिलेने एक प्रकारे पतीला अद्दलच घडवली.

बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव येथे एका 32 वर्षीय पीडीतेस वेश्या व्यवसाय करण्यासाठी दोन दिवस घरात डांबून बलात्कार करत मारहाण करण्यात आल्याची तक्रार मेहकर तालुक्यातील जानेफळ पोलीस स्टेशनला प्राप्त झाली आहे. सदर तक्रारीवरून पोलिसांनी 8 जणांविरुद्ध विविध कलमानुसार गुन्हे दाखल करून त्यातील तिघांना अटक केली आहे.याबाबत सविस्तर असे की जानेफळ पोलीस स्टेशन हद्दीतील एका गावातील पीडीतेला पती, सासू व नणंद अशा घरातीलच तिघांनी सन 2015 ते 26 एप्रिल 2025 दरम्यान स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी वेश्याव्यवसाय करण्यास प्रवृत्त केले. तसेच वेश्या व्यवसाय केला नाही तर पीडितेवर शारीरिक अत्याचार केले आणि सासू आणि नणंद यांच्या सांगण्यावरून शाम मधुकर मेतकर रा. जानेफळ तालुका मेहकर,

शेख मोहम्मद शेख शब्बीर रा. वरवंड तालुका मेहकर व इतरांनी पिडीतेवर बलात्कार केला आणि मारहाण करून दोन दिवस घरात डांबून ठेवले.या प्रकरणी पती, सासू, नणंद तसेच शाम मधुकर मेतकर (वय 36) व शेख मोहम्मद शेख शब्बीर (वय 45) व इतर तिघे जण अशा 8 जणांविरुद्ध कलम 64 (1),70 (1) भा. न्या. संहिता सह कलम 5, अनैतिक व्यापारास प्रतिबंध अधिनियम नुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यातील आरोपी शाम मंधुकर मेतकर, शेख मोहम्मद शेख शब्बीर व पिडित महिलेची नणंद यांना अटक करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींना मेहकर न्यायालयात हजर करण्यात आल्यानंतर त्यांना २दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. पुढील अधिक तपास जानेफळ पोलीस करीत आहेत.