साकळी येथे पाच गोवंशांची सुटका; एका विरुद्ध गुन्हा दाखल

यावल प्रतिनिधी l साकळी येथील शहेनशाहनगर परिसरातील एका पत्र्याच्या शेडमध्ये कत्तलीच्या उद्देशाने पाच गोवंश ठेवण्यात आल्याची माहिती मिळताच पोलिसांनी छापा टाकून ७५ हजार रुपये किमतीचे गोवंश ताब्यात घेतले. रविवारी करण्यात आलेल्या या कारवाईत शहाबाज खान लियाकत खान कुरेशी याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यावल पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांना मिळालेल्या माहितीनंतर पोलिसांचे पथक तात्काळ घटनास्थळी रवाना झाले. पोलिसांनी शेडमधून सर्व पाच गोवंशांची सुटका केली असून, त्यांना गोशाळेत हलविण्यात आले आहे.
या प्रकरणी हवालदार अनिल साळुंखे यांच्या फिर्यादीवरून शहाबाज खान कुरेशी याच्याविरुद्ध यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास हवालदार रोहील गणेश हे पोलीस निरीक्षक धारबळे यांच्या मार्गदर्शनाखाली करीत आहेत.