मान्सूनने वेग घेतला, देशभर पसरला; अनेक राज्यांत अतिवृष्टीचा इशारा

नवी दिल्ली (३० जून): देशात यंदा मान्सूनने वेग घेतला असून, सामान्य वेळेपेक्षा नऊ दिवस आधीच संपूर्ण देश व्यापला आहे. भारतीय हवामान विभागाने रविवारी ही माहिती दिली. दरम्यान, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, झारखंड आणि आसामसह काही राज्यांमध्ये मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.
सामान्यतः मान्सून २७ जून रोजी दिल्लीत दाखल होतो. मात्र, यंदा दोन दिवस उशिराने रविवारी राजधानीत पावसाचा आगमन झाला. कर्तव्यपथ परिसरात पावसात भिजत नागरिकांनी आनंद व्यक्त केला.
दुसरीकडे, हिमालयीन राज्यांमध्ये अतिवृष्टीमुळे मोठा फटका बसला आहे. उत्तरकाशी येथे झालेल्या ढगफुटीत दोन जणांचा मृत्यू झाला असून सात जण बेपत्ता आहेत. यमुनोत्री मार्गावरील दरड कोसळल्यामुळे चारधाम यात्रा तात्पुरती थांबवण्यात आली आहे.