कुसुंबा येथे ३७ वर्षीय तरुणाची आत्महत्या; गावात हळहळ

कुसुंबा येथे ३७ वर्षीय तरुणाची आत्महत्या; गावात हळहळ

जळगाव (प्रतिनिधी): कुसुंबा (ता. जळगाव) गावात राहणाऱ्या विशाल परशूराम पाटील (वय ३७) या युवकाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सोमवारी (७ जुलै) दुपारी तीनच्या सुमारास उघडकीस आली. आत्महत्येमागील कारण अद्याप अस्पष्ट असल्याने गावकऱ्यांत हळहळ व्यक्त केली जात आहे.

घटनेची माहिती मिळताच कुटुंबीयांनी आणि ग्रामस्थांनी विशाल याला तत्काळ शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

या घटनेने कुसुंबा गावात दुःखाचे वातावरण निर्माण झाले आहे. एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पोलीस हेडकॉन्स्टेबल गफुर तडवी यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.