दफनभूमीतून होणारी अवैध वाळू वाहतूक थांबवा; अन्यथा आमरण उपोषणाचा इशारा

तहसीलदारांना एकलव्य संघटनेचे निवेदन
भडगाव (प्रतिनिधी): भडगाव तालुक्यातील पिंपळगाव बुद्रुक येथील आदिवासी भिल्ल समाजाच्या परंपरागत दफनभूमीतून अवैध वाळू वाहतूक सुरू असून, त्यामुळे दफनभूमीचा पवित्र अपमान होत आहे. ही वाहतूक त्वरित थांबवावी, अन्यथा तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्याचा इशारा एकलव्य संघटनेने दिला आहे. यासंदर्भातील निवेदन तहसीलदार श्रीमती शितल सोलाट यांना देण्यात आले.
निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे की, दफनभूमीतून ट्रॅक्टरद्वारे अवैध वाळू नेली जात असून, त्यामुळे पूर्वी दफन केलेल्या मृतदेहांची विटंबना होत आहे. काही ठिकाणी बुजलेले मृतदेह बाहेर येण्याच्या स्थितीत आहेत. त्यामुळे समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्या जात असून, तातडीने ही वाळू वाहतूक थांबवावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
या निवेदनप्रसंगी एकलव्य संघटनेचे जिल्हाध्यक्ष संजय सोनवणे, युवा जिल्हाध्यक्ष रवी सोनवणे, तालुका अध्यक्ष किरण मोरे, शहराध्यक्ष विनोद मोरे, युवा तालुका उपाध्यक्ष रवींद्र मालचे, कर्मचारी तालुका अध्यक्ष समाधान मोरे तसेच पिंपळगाव येथील अमोल सोनवणे, अमोल मोरे, समाधान मोरे, मच्छिंद्र सोनवणे, समाधान महाले, वनराज पवार, विशाल महाले, रितेश गायकवाड, अनिल सोनवणे, विजय सोनवणे, भगवान सोनवणे, बाबाजी सोनवणे, सुनील सोनवणे, संजय सोनवणे, गोरख सोनवणे, राजेंद्र गायकवाड, राहुल मोरे, राजू सोनवणे, शंकर सोनवणे, वाल्मीक मोरे, सचिन सोनवणे, दीपक गायकवाड, सुदाम जाधव, आबा सोनवणे यांच्यासह मोठ्या संख्येने समाजबांधव उपस्थित होते.
यासंदर्भात प्रशासनाने त्वरित कारवाई करून दफनभूमीतील पवित्रता राखावी आणि अवैध वाळू वाहतूक करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.