चारचाकीच्या धडकेत दुचाकीस्वार जखमी

चारचाकीच्या धडकेत दुचाकीस्वार जखमी

अमळनेर : तालुक्यातील शिरसाळेजवळ चारचाकी वाहनाने राँग साईडने येऊन धडक दिल्याने दुचाकीस्वार जखमी झाल्याची घटना घडली. या प्रकरणी चारचाकी चालकाविरुद्ध मारवड पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वावडे येथील विश्वासराव फकिरा पाटील (वय ६५, ह.मु. जळगाव) हे त्यांचे मित्र दत्तात्रय बारकू पाटील यांच्यासोबत १९ रोजी वावडे येथून जळगाव कडे जात होते. शिरसाळे ते तळवळे गावादरम्यान वळणावर राँग साईडने येऊन मारुती अल्टो (एमएच १९, बीयू ६४३४) ने भरधाव वेगाने दुचाकीला धडक दिली. त्यामुळे मागे बसलेले दत्तात्रय पाटील हे फेकले गेल्याने गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारार्थ जळगाव येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, चारचाकी चालक तथा आसोदा येथील जगदीश कासार हा गाडी अपघातस्थळी सोडून पळून गेला. या अपघातात विश्वासराव पाटील यांना कपाळ व डोळ्यांना मार लागला आहे. तसेच डावा हात व उजवा गुडघा फ्रेंक्कर असून छातीला ही मार लागला आहे. या प्रकरणी विश्वासराव पाटील यांच्या फिर्यादीवरुन कारचालकाविरुद्ध मारवड पोलिसांत गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. तपास हे.कॉ. सुनील पाटील करत आहेत.