आधी नेते चोरले, पक्षही फोडला मात्र आता पाठिंबा मागता ?: उद्धव ठाकरी

First you stole leaders, then you broke the party, but now you are asking for support ?: Uddhav Thackeray मुंबई (29 ऑगस्ट 2025) : आधी नेते चोरले, पक्षही फोडला मात्र आता पाठिंबा मागता ? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना केला आहे.

सी.पी. राधाकृष्णन यांचे महाराष्ट्राच्या मतदार यादीमध्ये नाव आहे का हे बघावे लागेल. त्यांना पाठिंबा देण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी मला फोन केला होता या गोष्टीमध्ये तथ्य आहे पण आश्चर्य वाटले त्यांनी माझा पक्ष फोडला, चोरला. त्यांच्यासमोर उभे राहून माझी जी लोक निवडून आली ती ही त्यांना पाहिजे आहेत, या विनंतीला काय अर्थ आहे, असे उबाठाचे प्रमुख उद्धव ठाकरे म्हणाले.

उद्धव ठाकरे म्हणाले की, राष्ट्रपतिपदाची निवडणूक होती तेव्हा मी न मागता त्यांना मतदान केले होते. मला कुणीही विनंती केली नव्हती. पण त्यानंतर साधे आभार मानायला फोन केला नाही. गरज असेल तेव्हा वापरा आणि नसेल तेव्हा फेकून द्या ह्या पद्धतीला आपल्याला नाकारले पाहिजे. निवडणुकीत चमत्कार होईल अशी आम्हाला आशा आहे, असेही उद्धव ठाकरेंनी यावेळी म्हटले आहे.

उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांना फोन करून रेड्डी यांना पाठिंबा देण्याची विनंती करणार असल्याचे सांगितले. या भेटीने उपराष्ट्रपती निवडणुकीच्या रणधुमाळीला नवे वळण मिळाले आहे.

उद्धव ठाकरे म्हणाले की, आपल्या देशाचे उपराष्ट्रपती धनखड यांनी अचानक पदाचा राजीनामा दिला आणि ते गायब झाले. त्यांनी राजीनामा दिल्याने ही निवडणूक होत आहे. इंडिया आघाडी म्हणून एकजुटीने आपण ही निवडणूक लढवत आहोत. आमच्या आघाडीकडून सुदर्शन रेड्डी हे आमचे उमेदवार आहेत. त्यांनी संविधानाच्या चौकटीत राहून काम केले आहे. संविधानाचे शपथ घेऊन न्याय बुद्धीने वागणारे उपराष्ट्रपती आपल्याला हवे आहेत.