दमदाटीनंतर अजित पवार एकाकी : व्हायरल व्हिडिओनंतर मुख्यमंत्री नाराज ; म्हणाले, अधिकार्‍यांचा सन्मान हा राखायलाच हवा

The respect of officials must be maintained : Chief Minister Devendra Fadnavis after ‘that’ viral video मुंबई (9 सप्टेंबर 2025) : महायुती सरकारमध्येही अजित पवार एकटे पडले असून डीवायएसपी अंजना कृष्णा प्रकरणात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा व्हिडिओ समोर आल्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाराजी व्यक्त केली आहे. या व्हिडिओमुळे सरकारची प्रतिमा मलीन झाल्याचे फडणवीस म्हणाले आहेत.

मुख्यमंत्री अधिकार्‍यांच्या पाठीशी
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संबंधित महिला पोलिस अधिकार्‍याच्या पाठीशी ठाम असल्याचा विश्वास दिला आहे. सरकारमधील कोणताही नेता असो, अधिकार्‍यांचा सन्मान हा अबाधित राहायलाच हवा’, असा संदेश फडणवीसांनी दिला असल्याचं खात्रीलायक सूत्रांकडून सांगितलं जात आहे.

या खंबीर भूमिकेनंतर अजित पवार यांनी एक पाऊल मागे घेतल्याचं देखील सूत्रांनी सांगितलं आहे. अजित पवार यांनी थेट डीवायएसपी अंजना कृष्णा यांना दमदाटी केल्यानं त्यांच्यावर टीकेचे बाण सोडले जात होते तर दुसरीकडे राज्याचं राजकारणही तापलं आणि विरोधकांना एक नवीन विषय मिळाला.

अजित पवारांना त्यांच्या कार्यकर्त्याने नाहीतर तर एका मध्यस्थाच्या माध्यमातून फोन लावण्यात आला असल्याचा दावा खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी केला होता. दरम्यान, अजितदादा आणि महिला अधिकारी या दोघांच्या संवादाचा व्हिडिओ व्हायरल केल्याप्रकरणी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.