नमो शेतकरी महासन्मान किसान योजनेचा सातवा हप्ता शेतकर्‍यांच्या खात्यात

Seventh installment of Namo Shetkari Mahasamman Kisan Yojana in farmers’ accounts मुंबई (9 सप्टेंबर 2025) : नमो शेतकरी महासन्मान किसान योजनेचा सातवा हप्ता शेतकर्‍यांच्या खात्यात जमा झाला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते या हप्त्याचे वितरण करण्यात आले. राज्यातील 91 लाख 65 हजार 156 शेतकर्‍यांच्या बँक खात्यात एकूण एक हजार 892.61 कोटी रुपये निधी वर्ग करण्यात आला.

कृषी विभागाचा कार्यक्रम
मंत्रालय नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या अंतर्गत पात्र लाभार्थ्यांना सातव्या हप्त्याचा निधी वितरित करण्यासाठी कृषी विभागातर्फे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच कृषी मंत्री दत्तात्रय भरणे मंत्रीमंडळातील सदस्य, मुख्य सचिव राजेशकुमार यावेळी उपस्थित होते.

सातव्या हप्त्यामध्ये एप्रिल 2025 ते जुलै 2025 या महिन्यांचे अनुदान लाभार्थींना देण्यात आले. केंद्र शासनाने सुरू केलेल्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनाच्या धर्तीवर राज्य शासनाने ही योजना सुरू केली आहे. यामध्ये पात्र शेतकर्‍यांना थेट आर्थिक सहाय्य देऊन शेती खर्चाला हातभार लावण्याचा उद्देश आहे. या सातव्या हप्त्यामध्ये एप्रिल 2025 ते जुलै 2025 या महिन्यांचे अनुदान लाभार्थींना देण्यात आले. ज्या शेतकरी लाभार्थींचा प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेत समावेश आहे. त्या सर्वांना राज्याच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा लाभ मिळाला आहे. अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर हे अनुदान शेतकर्‍यांसाठी महत्वाचे ठरणार आहे.