निवडणुका कधीही होवू द्या : यश आम्हालाच मिळणार ! एकनाथ शिंदे

मुंबई (16 सप्टेंबर 2025) :राज्यात आता पुढील वर्षीय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार असल्यातरी राज्याचे उपमुख्यमंत्री तसेच शिवसेना शिंदे गटाचे प्रमुख एकनाथ शिंदे यांनी आम्हालाच या निवडणुकांमध्ये यश मिळणार असल्याचा दावा केला आहे.

एकनाथ शिंदे म्हणाले, निवडणूक आयोगाने जी मागणी केली होती, त्याप्रमाणे 31 जानेवारीपर्यंत राज्य निवडणूक आयोग पूर्णपणे निवडणूक घेण्यासाठी त्यांची तयारी आहे आणि या निवडणुका अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने व्हायला पाहिजे तसेच कुठलीही गैरसोय होता कामा नये, याचा विचार करूनच सुप्रीम कोर्टाने याबाबत 31 जानेवारीपर्यंत निवडणूक घेण्याचे आदेश दिले आहेत.

महापालिकेच्या निवडणुका आणि स्थानिक संस्थांच्या निवडणुका या एकत्रित घेतल्या जातील का? असा प्रश्न एकनाथ शिंदे यांना विचारला असता ते म्हणाले, निवडणूक आयोग कार्यक्रम जाहीर करेल. हा त्यांचा अधिकार आहे त्यामुळे निवडणुकीसाठी ज्या काही यंत्रणा लागतील त्याचा विचार करून निवडणूक आयोग कार्यक्रम जाहीर करेल.

पुढे बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले, जसे महायुतीला विधानसभेत मोठा विजय मिळाला, मोठे यश मिळाले, अडीच तीन वर्षांच्या कारकीर्दीत जे काम आम्ही केले, विकासाचे प्रकल्प राबवले, त्या कामाची पोचपावती विधानसभेच्या झालेल्या निवडणुकीत या महाराष्ट्रातल्या जनतेने दिल्या. यात लाडकी बहिण, लाडका भाऊ आणि लाडके शेतकरी या सगळ्यांनी आम्हाला विजयी केले. त्याच प्रमाणे येणार्‍या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये देखील महायुतीला मिळेल, असा विश्वास शिंदे यांनी यावेळी व्यक्त केला.