रोहिणी खडसे यांची पुन्हा चाकणकर यांच्यावर टीका

मुंबई- प्रतिनिधी । राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांनी रुपाली चाकणकर यांच्यावर टीका केली आहे. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकरांनी शिवसेना शिंदे गटाच्या मंत्र्यावर डान्सबारबाबत केलेल्या आरोपांवर बोलणे टाळल्यानंतर बाईंना अजूनही त्यांचं काम माहिती नाही ? सगळंच प्रदेशाध्यक्षांना विचारुन सांगणार का? असा सवाल रोहिणींनी विचारला आहे.

याबाबत सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरुन प्रतिक्रिया देताना रोहिणी खडसे म्हणाल्या की, महिला आयोगाच्या अध्यक्षांना अजूनही त्यांचं काम माहिती नाही. राज्यातील बार डान्स, बारबाला, सरकारमधील मंत्र्यांचा त्यात असलेला संबंध यावर पत्रकार प्रश्न विचारत आहेत, जो महिलांशी संबंधित आहे. महिला आयोगाशी संबंधित आहे. पत्रकारांनी उखाणा घ्यायला सांगितल्या सारखं काय नकार देता ? असा टोलाही रोहिणी खडसेंनी रुपाली चाकणकरांना लगावला.