Panchsheel Nagar residents will get water for 24 hour s: Work on Amrut Yojana begins भुसावळ (2 सप्टेंबर 2025) : केंद्र शासनाची महत्त्वपूर्ण योजना असलेल्या अमृत योजनेच्या कामाला शहरातील प्रभाग क्रमांक 18 मधील पंचशील नगरात नुकतीच सुरूवात झाली आहे. या भागात पाईप लाईन टाकण्यात आली नसल्याने नागरिकांना पाण्यासाठी वंचित रहावे लागणार होते मात्र समाजसेवक विनोद सोनवणे यांनी योजनेचे काम होण्यासाठी वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्याकडे पाठपुरावा केल्यानंतर त्यांनी तातडीने दखल घेत अधिकार्यांशी चर्चा करीत मार्गातील अडथळे दूर केले.

नागरिकांमध्ये समाधान : मंत्र्यांसह सोनवणेंचे मानले आभार
नुकतेच या योजनेच्या कामाचे श्रीफळ वाढवून विनोद सोनवणे यांच्याहस्ते उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी नितीन धांडे, बंटी नरवाडे, इंजिनिअर योगेश माळी, राहुल माळी, अल्ला बक्ष व प्रभागातील नागरिक उपस्थित होते. योजनेच्या कामासाठी नगरपालिका प्रशासन, अमृत योजनेचे अधिकार्यांचे सहकार्य लाभले. योजनेचे काम सुरू झाल्याने नागरिकांनी मंत्री सावकारे व विनोद सोनवणे यांचे आभार मानले आहेत.