पुण्यात नोकरी करणाऱ्या बाळदच्या तरुणाने उचलले टोकाचे पाऊल…

पुण्यात नोकरी करणाऱ्या बाळदच्या तरुणाने उचलले टोकाचे पाऊल…

शेतातील झाडाला गळफास घेत केली आत्महत्या

पाचोरा (प्रतिनिधी) – पुण्यात नोकरी करत असलेल्या एका २८ वर्षीय तरुणाने अचानक गावी येत झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना शनिवारी (दि. ७ जून) सकाळी पाचोरा तालुक्यातील बाळद बुद्रुक येथे उघडकीस आली. या घटनेमुळे संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे.

मृत तरुणाचे नाव समाधान पाटील असून तो काही महिन्यांपासून पुण्यात खासगी नोकरी करत होता. तो शुक्रवारी रात्री उशिरा अचानक गावी परत आला होता. शनिवारी सकाळी ७ वाजेच्या सुमारास गावाजवळील शेतात जाऊन त्याने झाडाला दोरीने गळफास घेऊन आपले जीवन संपवले.

घटनेची माहिती मिळताच पाचोरा पोलीस स्टेशनचे पथक घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाचोरा ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आला. या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पोलीस निरीक्षक अशोक पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कॉन्स्टेबल हरीश अहिरे तपास करत आहेत.

दरम्यान मयत समाधानच्या पश्चात त्याचे आई-वडील आणि एक मोठा भाऊ असा परिवार आहे